नवी दिल्ली - कोरोना महामारीत आयआरडीएआयने विमाधारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आरोग्य विमा कंपन्यांनी सध्याच्या आरोग्य विमा योजनेमध्ये बदल करू नये, असे आयआरडीएआयने निर्देश दिले आहेत. आरोग्य विम्यातील बदलामुळे विमाधारकांच्या विमा हप्त्यात वाढ होऊ नये, असेही आयआरडीएआयने निर्देशात म्हटले आहे.
आयरडीएआयने वैयक्तिक अपघात आणि प्रवास विमा योजनेतही बदल करू नये, असे विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) नियमांचे पालन करत विमा योजनेत किरकोळ बदल करण्याची परवानगी दिली आहे.