महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पेट्रोलसह डिझेलच्या दरात घसरण; जाणून घ्या, आजचे दर

जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर घसरले आहेत. त्यामुळे पेट्रोलसह डिझेलच्या किमती आज कमी झाल्या आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Sep 12, 2020, 3:05 PM IST

नवी दिल्ली- कोरोनाच्या संसर्गात भाववाढ होत असताना ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर आज प्रति लिटर १३ पैशांनी कमी झाले आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर १२ पैशांनी कमी झाले आहेत.

दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८१.८६ रुपये आहे. गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोलचे दर कमी आहेत. गेल्या सहा महिन्यात पेट्रोलचा दर प्रथम १० सप्टेंबरला प्रति लिटर ९ पैशांनी कमी होता. तर डिझेलचा दर आज प्रति लिटर ७३.०५ रुपयांवरून ७२.९३ रुपये आहे.

डिझेलचे दर मार्चनंतर पहिल्यांदाच ३ सप्टेंबरला कमी झाले होते. त्यानंतर डिझेलचा दर प्रति लिटर ६३ पैशांनी कमी आहे. देशात ७ जूननंतर डिझेलचा दर प्रति लिटर १२.५५ रुपयांनी वाढला आहे. डिझेलच्या किमती २५ जुलैनंतर दिल्ली वगळता देशात स्थिर राहिल्या होत्या.

दरम्यान, सरकारी कंपनी जागतिक बाजारातील खनिज तेलाच्या किमतीचा आढावा घेतात. त्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीतील दर रोज सकाळी ६ वाजता निश्चित करतात. कोरोनाचा जगभरात संसर्ग वाढत असल्याने जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर घसरले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details