नवी दिल्ली - केंद्रीय स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निप्पॉन स्टील आणि डायडो स्टील यांनी जपानच्या स्टील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची टोकियोमध्ये भेट घेतली. या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी निमंत्रण दिले आहे.
प्रधान हे दोन दिवसीय असलेल्या ग्लोबल फोरम ऑन स्टील एक्सेस कॅपिसीटीच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यासमेवत मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ते स्टील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत.
प्रधान यांनी टोकियोमधील डायडो स्टील कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तंत्रज्ञानाचे हस्तांतरणासह इतर विषयावर धर्मेंद्र प्रधान यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. प्रधान यांनी निप्पॉन स्टील कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी भारत ही स्टील उपभोक्त्यांची मोठी बाजारपेठ असल्याचे सांगितले. आकडेवारीनुसार, भारत हा स्टीलचा उपभोक्तता असलेला तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. निप्पॉन कंपनी ही भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्साह आहे. मेक इन इंडियाच्या उपक्रमांतर्गत त्यांना प्रधान यांनी निमंत्रित केले आहे.
हेही वाचा-दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची दुकानात गर्दी; धनत्रयोदशीला मात्र सराफा बाजाराकडे पाठ
डायडो ही जगातील सर्वात मोठ्या स्टील उत्पादक कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. या कंपनीमध्ये मॅग्नेटिक मटेरियल्स, वाहन उद्योगांचे सुट्टे भाग आणि औद्योगिक साधनांचेही उत्पादन घेतले जाते. निप्पॉन हे जगातील स्टील उत्पादक कंपनी आहे. निप्पॉन ही बांधकाम, वाहन आणि जहाजबांधणी उद्योगासाठी उत्पादनांची निर्मिती करते.