महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कौतुकास्पद! मुलांना हमखास शाळेत प्रवेश मिळवून देणारे १६ वर्षाच्या मुलीचे स्टार्टअप - स्टॅरिया

स्टॅरियाची या स्टार्टअपची संस्थापक रिया गुप्ता आहे. ती दिल्लीतील संस्कृती स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिने ह्या स्टार्टअपला जानेवारी २०१९ पासून सुरूवात केली. यामधून सुमारे १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत.

प्रतिकात्मक - शाळा प्रवेश

By

Published : May 28, 2019, 4:26 PM IST

नवी दिल्ली - शाळेत मुलांना प्रवेश करून द्यायचे काम पालकांसाठी जिकिरीचे असते. हे काम सोपे करण्यासाठी दिल्लीतील १६ वर्षाच्या मुलीने दिल्लीत स्टार्टअप सुरू केले आहे. त्यातून पाल्यांना १०० टक्के प्रवेशाची खात्री देण्यात येत आहे. तिच्या स्टार्टअपला ५० हून अधिक शाळा संलग्न आहेत.

स्टॅरियाची या स्टार्टअपची फाउंडर रिया गुप्ता आहे. ती दिल्लीतील संस्कृती स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिने ह्या स्टार्टअपला जानेवारी २०१९ पासून सुरूवात केली. यामधून सुमारे १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. पुढील वर्षी शाळा प्रवेशाच्या काळात दर महिन्याला १ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट्य तिने निश्चित केले आहे.

मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना मोफत मार्गदर्शन करण्यात येते. मात्र शाळेकडून प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शुल्क आकारण्यात येत असल्याचे रियाने सांगितले. शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे स्टॅरियामधून उत्तर देण्याचे ठरविले. स्टार्टअपच्या मदतीने पालक, शैक्षणिक संस्था व मुलांमधील दरी दूर करण्यात आल्याचेही तिने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details