नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या 2022-23 अर्थसंल्पात कर, रेल्वे, आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी, उद्योग, क्रीडा आणि इतरही क्षेत्रात भरीव तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
Union Budget 2022 : संरक्षण क्षेत्राला बुस्ट, मागील अर्थसंकल्पापेक्षा 58 टक्के जास्त तरतूद
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला यांनी सीतारमन लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या 2022-23 अर्थसंल्पात कर, रेल्वे, आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी, उद्योग, क्रीडा आणि इतरही क्षेत्रात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
Union Budget 2022
सर्वात मोठी घोषणा -
- आत्मनिर्भरताला चालना देण्यासाठी आणि संरक्षण उपकरणांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी संरक्षणासाठी भांडवली खरेदी बजेटच्या 68% रक्कम देशांतर्गत उद्योगासाठी राखून ठेवली जाईल. हे गेल्या आर्थिक वर्षाच्या 58% पेक्षा जास्त आहे, अशी घोषणा सीतारमन यांनी केली.
- संरक्षण उत्पादन खरेदीकरिता आत्मनिर्भर योजनेला प्रोत्साहन
- संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी 25 टक्के बजेटची तरतूद सरकारकडून केली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. सीमांवर अतिरिक्त परिस्थिती असल्याने या अर्थसंकल्पात संरक्षणावर अधिक लक्ष दिले जात आहे.
Last Updated : Feb 1, 2022, 12:40 PM IST