महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

गुगल मॅपमध्येही डार्क थीम उपलब्ध; अँड्राईड वापरकर्त्यांना मिळणार सुविधा - Dark theme features for Android 9

गुगल मॅपसाठी डार्क थीमच्या चाचणी सप्टेंबरपासून घेण्यात येत आहे. सध्या जगभरात गुगल अॅप हे डार्क थीममध्ये उपलब्ध झाले आहे. डार्क थीममध्ये डोळ्यांना विश्रांती मिळते. तसेच मोबाईलची बॅटरी कमी लागते.

google map dark theme
गुगल मॅप डार्क थीम

By

Published : Mar 22, 2021, 3:30 PM IST

सॅनफ्रान्सिस्को- गुगल मॅप हे डार्क थीममध्ये असावे, अशी वापरकर्त्यांची अखेर अपेक्षा पूर्ण झाली आहे. गुगलने जगभरात गुगल मॅप अँड्राईडच्या वापरकर्त्यांसाठी डार्क थीम लाँच केली आहे.

गुगल मॅपसाठी डार्ड थीम दिल्याची माहिती गुगलने ट्विट करून जाहीर केली आहे. तुम्हाला काय हवं आहे? डार्क थीम! तुम्हाला कोठे जाण्याची इच्छा आहे? गुगल मॅप्स! असे गुगलने ट्विटमध्ये म्हटले आहे.

गुगल मॅप डार्क थीम

हेही वाचा-गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचे काय होणार? मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली बैठक

  • गुगल मॅपसाठी डार्क थीमच्या चाचणी सप्टेंबरपासून घेण्यात येत आहे. सध्या जगभरात गुगल अॅप हे डार्क थीममध्ये उपलब्ध झाले आहे. डार्क थीममध्ये डोळ्यांना विश्रांती मिळते. तसेच मोबाईलची बॅटरी कमी लागते.
    गुगल मॅप डार्क थीम
  • डार्क थीम सुरू करण्यासाठी तुमच्या प्रोफाईलमध्ये जा. तिथे उजव्या बाजूला गुगल मॅप दिसेल त्यामध्ये थीम सेटिंगचा पर्याय निवडा. यामध्ये कॉन्फिगरेशन लिस्टमध्ये डार्क थीम सक्रिय करा.
  • वापरकर्त्यांना अँड्राईड ओएसचे अगदी अलीकडील अँड्राईड ओएस वापरावे लागेल. १०.६१.२ या अँड्राई ओएसमध्ये गुगल मॅप हे डार्क थीममध्ये उपलब्ध आहे.
    गुगल मॅप डार्क थीम
  • गुगल मॅप हे डार्क मॉडेल असताना त्यामध्ये सुपर डार्कची मागील बाजूला छटा आहे. रस्त्यांची नावे करड्या रंगाची आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना महत्त्वाच्या खुणा आणि रस्ते सहज सापडू शकतात.
  • गुगलने अँड्राईड हेडसेटसाठी पासवर्ड चेकअप फीचर सुरू केले आहे.
  • हे फीचर अँड्राईड ९ आणि त्याहून अधिक वरच्या श्रेणीतील अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टिमवर उपलब्ध आहे.

हेही वाचा-परमबीर सिंग यांचा गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न - नवाब मलिक

ABOUT THE AUTHOR

...view details