नवी दिल्ली - केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अहमदाबाद-मुंबई बुलेट रेल्वे प्रकल्पावर कोरोना महामारीचा परिणाम होणार आहे. ही माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लि. कंपनीचे (एनएचएसआरसीएल) अचल खरे यांनी दिली.
सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीचा बुलेटच्या प्रकल्पावर परिणाम होणार असल्याचे अचल खरे यांनी सांगितले. खरे म्हणाले, की अनेक गोष्टी सध्या करणे शक्य नाही. गेल्यावर्षी जपानच्या कंत्राटदारांना समुद्रांतर्गत जाणाऱ्या बोगद्याचा प्रकल्प खुला केला होता. तेव्हा सामान्य स्थिती होती. सध्या परिस्थिती बदलली आहे. दृष्टीकोन बदलला आहे. अनेक कंत्राटाची प्रक्रिया सुरू करता येत नाही. काही कार्यालये सुरू झाली नाहीत. तर काही कार्यालये ही प्रतिबंधित क्षेत्रात आहेत. त्यामुळे कंत्राटाची प्रक्रिया पुढे ढकलली आहे.
हेही वाचा-उद्योगानुकूलतेच्या राज्यांच्या यादीत आंध्र प्रदेशचा पुन्हा पहिला