महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एलईडी दिव्यांच्या किमती १० टक्क्यापर्यंत वाढणार; कोरोनाचा परिणाम - एलईडी किमती

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाप्रमाणे विद्युत उद्योगावरही कोरोनाचा परिणाम होत आहे. चीनमधील इलेक्ट्रॉनिक सुट्ट्या भागांचे निर्मिती करणारे उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. ही माहिती इलेक्ट्रिक लॅम्प अँड कंपोन्ट मॅन्युफॅक्चुअर्स असोसिएशनने (एलसीओएमए) दिली आहे.

File photo
संग्रहित

By

Published : Feb 18, 2020, 7:19 PM IST

नवी दिल्ली - एलईडी दिव्यांच्या किमती मार्चपासून १० टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. चीनमध्ये कोरोनामुळे अनेक उद्योग ठप्प असल्याने इलेक्ट्रॉनिक उत्पादकांना लागणारा कच्चा माल मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाप्रमाणे विद्युत उद्योगावरही कोरोनाचा परिणाम होत आहे. चीनमधील इलेक्ट्रॉनिक सुट्ट्या भागांचे निर्मिती करणारे उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. ही माहिती इलेक्ट्रिक लॅम्प अँड कंपोन्ट मॅन्युफॅक्चुअर्स असोसिएशनने (एलसीओएमए) दिली आहे. कोरोनामुळे चीपसारख्या सुट्ट्या भागांची कमतरता निर्माण झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याचे इएलसीओएमएचे उपाध्यक्ष सुमित पद्माकर जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा-एजीआर शुल्क: कुमार मंगलम बिर्ला यांनी दूरसंचार मंत्रालयाच्या सचिवांची घेतली भेट

देशातील एलईडी दिव्यांच्या निर्मितीसाठी लागणारे ३० टक्के घटक आयात करण्यात येतात. त्यामुळे एलईडी दिव्यांच्या किमती ८ ते १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. जानेवारीपासून एक महिन्यापर्यंत सुट्ट्या भागांसाठी उद्योग तग धरू शकतात. सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, असे वाटले होते. प्रत्यक्षात तसे घडत नसल्याचेही जोशी यांनी सांगितले.

ईएलसीओएमए ही जून १९७० मध्ये स्थापन झाली. ही संघटना देशातील विद्युत (लाईटिंग) उद्योगांचे प्रतिनिधीत्व करते.

हेही वाचा-'कोरोना'चा आयातीवर परिणाम; सीआयआयची मोदी सरकारकडे अनुदानाची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details