अमरावती (आंध्रप्रदेश) - कोरोनामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीत आंध्रप्रदेशमधील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आंध्रप्रदेश राज्य परिवहन महामंडळाने (एपीएसआरटीसी) ६ हजार २७० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
एपीएसआरटीसीच्या व्यवस्थापनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना तोंडी आदेश देत कामावर न येण्याचे आदेश दिले आहेत. बस डेपो व्यवस्थापकांना सेवेसाठी बाहेरून कर्मचारी आऊटसोर्स करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एपीएसआरटीसीमध्ये सुमारे ५२,००० कायम सेवेत असलेले कर्मचारी आहेत.
हेही वाचा-पशुसंवर्धन विकासाच्या पायाभूत सुविधांकरता केंद्र सरकार देणार १५ हजार कोटी
कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे, अशी विनंतरी कर्मचारी संघटनेने वाहतूक मंत्री पेरणी नानी यांच्याकडे केली आहे. टाळेबंदीत कोणत्या खासगी अथवा सरकारी संस्थेमधून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. याकडे कर्मचारी संघटनेने वाहतूक मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना एप्रिलचे वेतनही देण्यात आले नसल्याचे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.
हेही वाचा-तिसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेजचे उद्योगजगतासह पंतप्रधानांकडून स्वागत
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक ठप्प असल्याने सरकारसह खासगी वाहतूक कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे.