महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'या' कारणामुळे भारतातून आयात होणाऱ्या डुक्कराच्या मांसावर चीनमध्ये बंदी - border tension in China & India

भारतात मे महिन्याच्या सुरुवातीला आसाममध्ये रानडुक्कर आणि डुक्करामध्ये आफ्रिकन स्वाईन फ्ल्यू आढळून आल्याचे चिनी माध्यमाने म्हटले आहे.

डुक्कर
डुक्कर

By

Published : May 29, 2020, 12:57 PM IST

बीजिंग - जगभरातील कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनला स्वाईन फ्ल्यूची भीती वाटू लागली आहे. स्वाईन फ्ल्यूचे कारण दाखवून चीनने भारतामधून आयात होणाऱ्या डुक्कराचे मांस आणि रानडुक्कराच्या मांसावर बंदी घातली आहे.

चीनच्या उत्पादन शुल्काच्या सामान्य प्रशासनाने आणि कृषी मंत्रालयाने भारतामधून आयात करण्यात येणाऱ्या मांसावर बंदी घातली आहे. याचा उल्लेख चीनच्या सरकारी माध्यमाने वृत्तात केला आहे. भारत आणि चीनमध्ये सीमारेषेवर तणाव असताना चीनने मांस आयातीवर बंदी घातली आहे.

हेही वाचा-टाळेबंदीने उपासमार; व्यवसाय सुरू करण्याची फूल विक्रेत्यांची सरकारकडे मागणी

भारत-चीन सीमारेषेवर तणाव-

भारतात मे महिन्याच्या सुरुवातीला आसाममध्ये रानडुक्कर आणि डुक्करामध्ये आफ्रिकन स्वाईन फ्ल्यू आढळून आल्याचे चिनी माध्यमाने म्हटले आहे. यामध्ये आसाममधील २४ हजार डुक्करांचा मृत्यू झाल्याचे वृत्तात म्हटले आहे. सीमारेषेवरील वाद शांततेने सोडविण्यासाठी भारत चीनबरोबर चर्चा करत असल्याचे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी गुरुवारी म्हटले आहे.

हेही वाचा-लॉकडाऊनमध्ये अॅमेझॉनकडून सुखद धक्का.. सव्वा लाख हंगामी कर्मचाऱ्यांना 'ही' दिली ऑफर

दोन्ही देशांचा एकमेकांना धोका नसल्याचे भारतामधील चीनचे राजदूत सन वायंगडोंग यांनी नुकतेच म्हटले होते. दोन्ही देशांमधील मतभेद हे चर्चेच्या माध्यमामधून सोडविण्याची गरज आहे. त्याचा द्विपक्षीयसंबंधावर परिणाम होवू नये, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details