नवी दिल्ली - कोरोनाच्या धास्तीने ग्राहकांनी चिकन खरेदीकडे पाठ फिरविली आहे. देशात चिकन ७० टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. तर चिकन विक्रीत ५० टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या महिन्यात चिकनमुळे कोरोना होतो, अशी समाज माध्यमात अफवा पसरली होती. त्यानंतर मागणी आणि किमती घसरल्याचे गोदरेज अॅग्रोवेट कंपनीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
गोदरेज अॅग्रोवेटचे व्यवस्थापकीय संचालक बी. एस. यादव म्हणाले, गोदरेज टायसन फूडची विक्री ४० टक्क्यांनी घसरली आहे. चिकनमुळे कोरोना होत नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने अफवा पसरविण्यांवर कारवाई करावी, असे केंद्र सरकारने आदेशही दिले आहेत.