नवी दिल्ली - पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील घरगुती गॅसच्या वापरात महालेखापरीक्षकांना (कॅग) अनियमितता आढळून आली आहे. उपभोक्त्यांना दर महिन्याला सिलिंडर वापरण्याची मर्यादित परवानगी असते. मात्र, १३.९६ लाख वापरकर्त्यांनी दर महिन्याला ३ ते ४१ सिलिंडर वापर करत असल्याचे कॅगने अहवालात म्हटले आहे.
सरासरी घरगुती गॅस सिलिंडरचा होणार वापर हा जोडणीच्या प्रमाणात नसल्याचे कॅगने अहवालात निरीक्षण नोंदविले आहे.
दर महिन्याला घरगुती गॅस सिलिंडरचा वाढता वापर
महालेखापरीक्षकांनी पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा मासिक किती वापर होतो, या आकडेवारीचा अभ्यास केला. यामध्ये १३.९६ लाख वापरकर्ते दर महिन्याला २०.१२ लाख सिलिंडरचा वापर करत असल्याचे आढळून आले. नवीन गॅस जोडणी घेतल्यापासून उपभोक्ते दर महिन्याला ३ ते ४१ वेळा गॅस भरत असल्याचे निरीक्षण कॅगने नोंदविले.
हेही वाचा-दूध महागले! मदर डेअरीकडून प्रति लिटर ३ रुपयांची दरवाढ