नवी दिल्ली - जागतिक दूरसंचार दिनानिमित्त बीएसएनएलने शुक्रवारी ग्राहकांना सेवा देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. बीएसएनएलने देशभरात वायफाय सेवा देण्यासाठी गुगलबरोबर भागीदारीचा करार केला आहे. यामुळे देशातील अनेक ग्राहकांना मोफत वायफाय सेवेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ग्राहकांना वायफायने वेगवान इंटरनेटची सेवा मिळणार आहे.
बीएसएनल विस्तारणार वायफाय सेवेचे जाळे ; गुगलबरोबर भागीदारीचा करार - बीएसएनएल
ग्रामीण भागातील वायफाय फूटप्रिंट वाढविण्यासाठी बीएसएनएल प्रयत्न करत आहे. यातून केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्याचे बीएसएनएलचे उद्दिष्ट आहे.
ग्रामीण भागातील वायफाय फूटप्रिंट वाढविण्यासाठी बीएसएनएल प्रयत्न करत आहे. यातून केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्याचे बीएसएनएलचे उद्दिष्ट आहे. बीएसएनलचे संचालक विवेक बन्सल म्हणाले, आम्ही विविध कंपन्यांबरोबर भागीदारी करत आहोत. यातून इंटरनेटची गती वाढविण्याची ग्राहकांची मागणी पूर्ण करणे व अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचणे हा हेतू आहे. या भागीदारीतून कंपनीचे तंत्रज्ञान अद्ययावत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बीएसएनचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी बीएसएनएल-गुगल स्टेशनच्या मोफत वायफाय सेवेचे शुक्रवारी अनावरण (सॉफ्ट लॉन्च) केले. देशात बीएसएनएलचे ३८ हजार वायफाय हॉटस्पॉट स्थळ कार्यरत आहेत. ग्राहक किमान १९ रुपयांचे रिचार्ज करून वायफाय सेवेचा लाभ घेवू शकतात.