बाजारात तेजी, शेअर निर्देशांक सहा महिन्यानंतर प्रथमच ३८ हजारांवर
कोटक बँकेचे शेअर ४.५ टक्क्याने वधारल्याचे दिसून आले. तर ओएनजीसी, पावरग्रिड, टीसीएस आणि एनटीपीसीच्या शेअरमध्ये २ टक्के तेजी दिसून आली.
मुंबई -बँक आणि वित्तीय संस्थांच्या शेअरची जोरदार खरेदी झाल्याने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. गेल्या सहा महिन्यात प्रथमच शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ३८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीने ११, ४०० अंकाचा टप्पा ओलांडला आहे.
बँक निफ्टी ४५८ अंशाने वधारून २९३८१ वर बंद झाला. शेअर बाजार निर्देशांक ३८०२४ अंशावर बंद झाला. निफ्टीच्या अंकातही ८४ अंशानी वाढ होऊन तो ११४२७ वर बंद झाला. गुंतवणुकदारांनी बँक, वित्तीय संस्था आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची चांगली खरेदी केली. कोटक बँकेचे शेअर ४.५ टक्क्याने वधारल्याचे दिसून आले. तर ओएनजीसी, पावरग्रिड, टीसीएस आणि एनटीपीसीच्या शेअरमध्ये २ टक्के तेजी दिसून आली. तर एचयूएल आणि येस बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली. गुरुवारी केवळ ३ अंशाने निर्देशांक वाढून शेअरबाजार ३७७५५ अंशावर बंद झाला होता.