नवी दिल्ली- महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने बोलेरो पिक-अपच्या उत्पादनात आज मैलाचा दगड गाठला आहे. बोलेरो पिक-अपचे पंधरा लाखावे उत्पादन हे मुंबईच्या कांदिवली उत्पादन प्रकल्पामधून घेण्यात आले.
एम अँड एमचे अध्यक्ष राजन वढेरा (ऑटोमिटिव्ह क्षेत्र) म्हणाले, हे यश म्हणजे आमच्या ब्रँडवर ग्राहकांनी दाखविलेला विश्वास आहे. एम अँड एमचे बोलेरो पिक अप, बोलेरो मॅक्सी ट्रक, बोलेरो कॅम्पर आणि इम्पेरिओ ही चार पिक अपची मॉडेल आहेत. गेली २० वर्षे पिक अप वाहनाच्या प्रकारामध्ये आघाडीवर आहोत. ग्राहकांची गरज ओळखणारी यंत्रणा आणि प्रक्रिया तयार केल्याचे त्यांनी सांगितले.