नवी दिल्ली- कर्जबुडव्या विजय मल्ल्याने इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयात प्रत्यार्पणाविरोधात दाखल केलेले अपील न्यायालयाने फेटाळून लावले आहे. हा मोठा विजय असल्याचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हटले आहे. या निकालाने मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
लंडनमधील उच्च न्यायालयाने (वेस्टमिनिस्ट मॅजिस्ट्रेट न्यायालय) विजय मल्ल्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता देणारा निकाल २० एप्रिलला दिला होता. या दिवसापासून १४ दिवसात मल्ल्याला सर्वोच्च न्यायलयात अपील करणे बंधनकारक होते. त्यामुळे इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळण्यासाठी मल्ल्याने अपील केले. मात्र, हे अपील फेटाळून लावण्यात आले. भारत सरकारने गेल्या आठवड्यात आपली बाजू मांडणारे कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते.
हेही वाचा-कोणत्याही अटी न घालता पैसे घ्या आणि माझ्याविरोधातील खटला बंद करा - विजय मल्ल्या