बार्सेलोना - मोबाईल कंपनी नोकियाने ५ जीची चाचणी भारती एअरटेलबरोबर घेणार असल्याचे जाहीर केले. या 5 जीच्या चाचणीने दूरसंचार कंपनीच्या सेवेत सुधारणा होणार असल्याचे नोकियाने म्हटले आहे.
भारती एअरटेलबरोबर घेण्यात येणारी 5 जीची चाचणी ही महत्त्वाची पूर्वतयारी असल्याचे नोकिया इंडियाचे प्रमुख संजय मलिक यांनी सांगितले. भविष्यातील दूरसंचार नेटवर्कची गरज आणि हायस्पीड डाटाची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 5 जीच्या चाचणीसाठी अंतिम तारीख ठरविण्यात आली नाही, मात्र त्यासाठी तयारी झाल्याचे नोकियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.