नवी दिल्ली- कर्जाचा मासिक हप्ता भरण्यासाठी ग्राहकांना बँकांकडून दर महिन्याला नोटीस दिली जाते. मात्र, कोरोनाचे संकट असताना चार सरकारी बँकांकडून तीन महिन्यांची मुदत दिली जाणार आहे. ही मुदत भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार दिली जाणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियासह चार सरकारी बँकांनी ट्विट करत 'मार्च १ ते ३१ मे'दरम्यानच्या मासिक हप्त्यांबाबत माहिती दिली. या तीन महिन्यांतील मासिक हप्ते भरण्यासाठी मुदतीची सवलत दिली जाणार आहे. कर्जामध्ये गृहकर्ज , एमएसएमई, वाहन कर्ज इतर सर्व मासिक हप्त्याने घेतल्या कर्जाचा समावेश आहे.
हेही वाचा-एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान केंद्र सरकार घेणार ४.८८ लाख कोटींचे कर्ज