महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Many Rules Change From 1 February 2022 : घरघुती नाही तर व्यावसायिक गॅसच्या किंमतीत बदल, जाणून घ्या नवीन किंमत

2022 वर्षातील दुसरा लवकरच सुरू होणार आहे. 1 फेब्रुवारीपासून बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमावलीत बदल होणार होणार आहे. ( Banking Rules Change From 1 February 2022 ) या व्यापक प्रमाणावर प्रभाव पाहायला मिळणार आहे.

By

Published : Jan 30, 2022, 4:59 PM IST

Updated : Feb 1, 2022, 1:31 PM IST

Banking Rules LPG Price Change From 1 February 2022
घरघुती गॅस किंमतीत, बँकेच्या नियमावलीत एक तारखेपासून बदल होणार

नवी दिल्ली -2022 वर्षातील दुसरा लवकरच सुरू होणार आहे. 1 फेब्रुवारीपासून बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमावलीत बदल होणार होणार आहे. ( Banking Rules Change From 1 February 2022 ) या व्यापक प्रमाणावर प्रभाव पाहायला मिळणार आहे. बँकिंग, रेल्वे आणि पोस्ट ऑफिसशी संबंधित बदल आणि एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये बदल यासांरख्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यासंबंधीचा एक आढावा.

गॅसच्या किंमतीत बदल -

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये 91.5 रुपयांची घट झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक गॅसच्या किंमतीमध्ये घट केली आहे.मात्र, घरघुती गॅसच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅसची किंमत आता 91.5 रुपये घट होऊन 1,907 रुपये इतकी झाली आहे.

एसबीआयच्या आयएमपीएस नियमांमध्ये बदल -

देशातील सर्वात मोठी भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) कोणत्याही ट्रांजैक्शनच्या रेटमध्ये होणारा बदल सामान्य माणसाच्या आयुष्यावर प्रभाव टाकतो. एक फेब्रवारीपासून एसबीआयच्या IMPS Rates मध्ये बदल होणार आहे. एसबीआय (SBI) आता दोन लाख रुपयांपर्यंतच्या IMPS वर कोणत्याही प्रकारचा चार्ज वसूल करणार नाही. याचप्रकारे आरबीआय (RBI) द्वारा IMPS ची मर्यादा वाढवून पाच लांख रुपयांपर्यंत केल्यानंतर बँकेनेसुद्धा IMPSची मर्यादा वाढवून पाच लाख रुपये केली आहे. भारतीय स्टेट बँक (State Bank of India) ने म्हटले आहे की, जर कोणता ग्राहक इंटरनेट बँकिंग/ मोबाइल बँकिंग (YONO SBI सहित) च्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतचे IMPS केले तर त्याच्याकडून कोणतेही पैसे घेतले जाणारा नाही.

ब्रांचच्या माध्यमातून IMPS महाग पडेल -

भारतीय स्टेट बँकेने म्हटले आहे की, जर कुणी व्यक्ति बँकेत जाऊन IMPS करत असेल तर ते त्याच्यासाठी आधीचे नियम लागूच राहतील. या नियमांनुसार, बँकेच्या शाखेतून एक हजार रुपयांपर्यतच्या IMPS वर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. तर 1,000 रुपयांपासून 10,000 रुपयांपर्यंतच्या IMPS वर 2 रुपये + जीएसटी, 10 हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतच्या IMPS वर 4 रुपये + जीएसटी आणि एक लाख रुपयांपासून ते दो लाख रुपयांपर्यंतच्या IMPS वर आधीसारखे 12 रुपये + जीएसटी द्यावे लागेल. दोन लाख रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या IMPS वर 20 रुपये + जीएसटी द्यावे लागेल.

Last Updated : Feb 1, 2022, 1:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details