नवी दिल्ली - सणाच्या काळात बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना खूश करणारी कर्ज योजना जाहीर केली आहे. बँक ऑफ इंडियाने कर्जावर घेण्यात येणारे प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. तसेच गृहकर्जावर सवलत देण्याचे जाहीर केले आहे.
बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक सलील कुमार स्वैन यांनी किरकोळ कर्जावारील प्रक्रिया शुल्क माफ करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच गृहकर्जावरील व्याजात सवलत दिल्याची त्यांनी माहिती दिली. गृहकर्ज हे 30 लाखापर्यंत घेतल्यास त्यासाठी वार्षिक 8.35 टक्के व्याजदर असणार आहे. तर 30 लाखांहून अधिक कर्ज घेतल्यास ते रेपो दराशी संलग्न असणार असल्याचे स्वैन यांनी सांगितले.
हेही वाचा-बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना खूशखबर.. कर्ज होणार स्वस्त