महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

दिलासादायक निर्णय घ्या; अ‌ॅम्युझमेंट पार्क उद्योगाची पंतप्रधानांकडे मागणी - COVID 19 pandemic

इंडियन असोसिएशन ऑफ अ‌ॅम्युझमेंट पार्क्स अँड इंडस्ट्रीजने (आयएएपीआय) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून दिलासादायक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. संघटनेचे महासचिव अनिल पडवळ म्हणाले, मार्च ते जूनदरम्यान आम्हाला वर्षभरातील ४० टक्के उत्पन्न मिळत असते.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Apr 16, 2020, 8:58 PM IST

मुंबई - देशात अ‌ॅम्युझमेंट पार्क क्षेत्र हे २ हजार ३०० कोटी रुपयांचे आहे. या क्षेत्रामधून थेट ८० हजार जणांना रोजगार देण्यात येतो. कोरोनाचे संकट आणि टाळाबंदीमुळे अ‌ॅम्युझमेंट पार्क क्षेत्र अडचणीत सापडले आहे. या क्षेत्राला सरकारने मदत करावी, अशी आयएएपीआय संघटनेने मागणी केली आहे.

इंडियन असोसिएशन ऑफ अ‌ॅम्युझमेंट पार्क्स अँड इंडस्ट्रीजने (आयएएपीआय) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून दिलासादायक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. संघटनेचे महासचिव अनिल पडवळ म्हणाले, मार्च ते जूनदरम्यान आम्हाला वर्षभरातील ४० टक्के उत्पन्न मिळत असते.

हेही वाचा-टाळेबंदीने रद्द झालेल्या विमान तिकिटांचे प्रवाशांना पूर्ण पैसे मिळणार

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पावसाळा आणि त्यानंतर सहा महिने व्यवसाय होत नाही, असेही त्यांनी सांगितले. या क्षेत्रामधून अप्रत्यक्षपणे ३ लाख लोकांना रोजगार मिळत असल्याची त्यांनी माहिती दिली. जीएसटी, प्रत्यक्ष कर अशा विविध सवलती संघटनेने सरकारकडे मागितल्या आहेत. देशातील अ‌ॅम्युझमेंट पार्क २५ मार्चपासून बंद आहेत.

हेही वाचा-टाटाकडून मोलाची मदत; १५० कोटींच्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

ABOUT THE AUTHOR

...view details