महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचा आर्थिक फटका, अलवारला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट - Rajasthan Tourism

अलवार हे राजमहाल, किल्ले, भुतांनी झपाटलेला (हॉन्टेड) भानगड आणि सरिस्का राष्ट्रीय उद्यान यामुळे प्रसिद्ध आहे.

राजस्थान पर्यटन

By

Published : May 12, 2019, 7:07 PM IST

Updated : May 13, 2019, 5:42 PM IST

जयपूर -राजस्थानमधील अलवार शहर हे आजवर विदेशी पर्यटकांचे आवडते ठिकाण राहिले आहे. मात्र गुन्हेगारीचे प्रमाण वाढताच अलवार शहराच्या पर्यटन उद्योगाला उतरती कळा येऊ लागली आहे. मॉब लिंचिग, गो-तस्करी आणि सामूहिक बलात्कार अशा घटनांनी पर्यटनस्थळ असलेल्या अलवारचे नाव चर्चेत आले होते.

राजस्थानच्या पर्यटन विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार (आरटीडीसी) अलवारला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्येत कमालीची घट झाली आहे. अलवार हे राजमहाल, किल्ले, भुतांनी झपाटलेला (हॉन्टेड) भानगड आणि सरिस्का राष्ट्रीय उद्यान यामुळे प्रसिद्ध आहे.


अशी घटली पर्यटकांची संख्या-
२०१४ मध्ये अलवारला १८ हजार ६५० पर्यटकांनी भेट दिली आहे. या संख्येत घट कमी होवून २०१५ मध्ये १० हजार ६५४ पर्यटकांनी भेट दिली आहे. तर या संख्येत आणखी घट होवून २०१६ मध्ये केवळ ८ हजार ५२४ पर्यटकांनी भेट दिली आहे. असे असले तरी २०१७ मध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ होवून ही संख्या १२ हजार २९६ एवढी झाली आहे.

जसे अलवारमधील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले तशी पर्यटकांचे प्रमाणही कमी झाले आहे. अलवारमध्ये २०१५ पासून ४०० गो-तस्करीच्या घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. तर मॉब लिचींगच्या तीन घटना घडल्या आहेत.

Last Updated : May 13, 2019, 5:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details