महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सर्व टोल नाक्यावरील रांगा होणार 'फास्टॅग', नियम भंग केल्यास भरावे लागणार दुप्पट पैसे

फास्टॅग ही टोलचे पैसे प्रीपेड भरण्याची सुविधा आहे. यामुळे वाहनचालकाला टोलनाक्यावर वाहन न थांबविता पुढे जाणे शक्य होते. यामध्ये रिडिओ फिक्वेन्सीची ओळख असलेली चीप वाहनाला बसविण्यात येते.

फास्टॅग

By

Published : Jul 20, 2019, 2:46 PM IST

नवी दिल्ली- टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याच्या सर्व रांगा फास्टॅग करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय १ डिसेंबरपासून अमलात येणार आहे. जर कोणत्याही वाहनचालकाने फास्टॅगसाठी पैसे भरले नसताना त्या लेनमधून प्रवेश केल्यास दुप्पट पैसे त्याला भरावे लागणार आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टटॅगच्या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. टोल नाक्यावर डिजीटल पद्धतीने पेमेंट होण्याच्या प्रमाणात वाढ व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कमी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

टोलनाक्यावरील एक रांग राहणार 'हायब्रीड लेन'-
टोलनाक्यावरील एका हायब्रीड रांगेमधून अवजड वाहनांना जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या रांगेतूनही फास्टॅग वाहने व त्यांचे टोलसाठीचे पैसे स्वीकारण्यात येणार आहेत. काही कालावधीनंतर ही रांगही 'फास्टॅग लेन' म्हणून घोषणा करण्यात येईल, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.

काय आहे फास्टॅग-
फास्टॅग ही टोलचे पैसे प्रीपेड भरण्याची सुविधा आहे. यामुळे वाहनचालकाला टोलनाक्यावर वाहन न थांबविता पुढे जाणे शक्य होते. यामध्ये रेडिओ फिक्वेन्सीची ओळख असलेली चीप वाहनाला बसविण्यात येते.

सध्या फास्टॅग नसतानाही त्यासाठी असलेल्या रांगेमधून वाहने जात असतात. त्यामुळे टोल नाक्यावर वाहनांची अनेकदा गर्दी होत असते. अद्याप, फास्टॅगचा वापर वाढलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर फास्टॅगचा वापर होण्यासाठी प्रोत्साहन देणारा निर्णय सरकारने घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details