नवी दिल्ली - भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएए) नवनियुक्त चेअरमन अरविंद सिंह यांनी पायाभूत सुविधांचे अद्यावतीकरण करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी येत्या पाच वर्षात २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती त्यांनीदिली.
हवाई क्षेत्रातील अद्यावतीकरणासाठी अब्जावधी डॉलरची गरज असल्याचे अरविंद सिंह यांनी सांगितले. सध्या, ३९५ दशलक्ष प्रवासी आम्ही हाताळत आहोत. ही संख्या वाढून ५५० दशलक्ष होईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा-देशातील अॅमेझॉन प्राईममध्ये दुप्पट गुंतवणूक करणार - जेफ बेझोस
'उडाण' योजनेवर भारतीय विमानतळ प्राधिकरण काम करत आहे. जो प्रदेश विमान वाहतुकीशी जोडण्यात आलेला नाही, तिथे विमानतळे बांधण्याचे ध्येय आहे. यामधून देशातील विमानतळांची संख्या दुप्पट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उडाण ही केंद्र सरकारची योजना आहे. यामध्ये लहान शहरामधूनही नियमित विमान उड्डाणे व्हावीत, यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.
हेही वाचा-पियूष गोयल यांच्या वक्तव्यानंतर अॅमेझॉनने 'ही' केली घोषणा