महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१९ परिषदेचे होणार आयोजन, ५ जी आणि फोल्डेबल स्मार्टफोनचा राहणार प्रभाव

जगातील बहुतेक देशांत ५ जी तंत्रज्ञान पोहोचण्यासाठी ५ वर्षे लागतील.

5 जी

By

Published : Feb 18, 2019, 1:25 PM IST

नवी दिल्ली - मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१९ परिषदेचे २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान स्पेनमधील बार्सेलोनामध्ये आयोजन होणार आहे. या परिषदेमध्ये ५ जी आणि फोल्डेबल स्मार्टफोनचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे.

जीएसएमए मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (एमडब्ल्यूसी) हे मोबाईल उद्योगाचे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे. फॉर्रेस्टर या ग्लोबल मार्केट रिसर्च संस्थेचे उपाध्यक्ष आणि मुख्य विश्लेषक थॉमस हुस्सॉन हे आहेत. ते म्हणाले, की ५ जीच्या पायाभूत सुविधांनी जग जोडले गेले आहे. अमेरिका-चीनमधील आर्थिक आणि राजकीय वादाचे हेच मूळ कारण आहे. जगातील बहुतेक देशांत ५ जी तंत्रज्ञान पोहोचण्यासाठी ५ वर्षे लागेल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.


५ जी स्मार्टफोनबाबत पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यासाठी काही वेळ लागणार आहे. विशेषत: युरोपमध्ये स्पेक्ट्रमच्या वाटपाबाबत देशपातळीवर गोंधळ असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोबाईल काँग्रेसदरम्यान अनेक स्मार्टफोन आणि दूरसंचार क्षेत्राला पायाभूत सुविधा देणाऱ्या कंपन्या सहभागी होत आहेत. फॉर्रेस्टरचे वरिष्ठ विश्लेषक पॉल मिलर म्हणाले, की व्हर्च्युल रिअॅल्टी ही प्रगल्भ होत आहे. त्याचा पुरावा मोबाईल काँग्रेसमध्ये दिसून येणार आहे. तसेच इंटरनेट ऑफ थिंग्जमध्येही सुधारणा होत आहे. यातून सेवा देणारे व्यवसायांचे नवे मॉडेल विकसित होत आहेत.

देशात ५ जी तंत्रज्ञानाची यंदा घेण्यात येणार प्रायोगिक चाचणी-
देशात ५ जी तंत्रज्ञानाची ऑगस्ट २०१९ पर्यंत लिलावासाठी प्रक्रिया पूर्ण होईल, असा केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाचा प्रयत्न आहे. तसेच प्रायोगिक तत्वावर चाचणीही घेण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details