हैदराबाद- आपल्या मुलांची आणि जवळच्या व्यक्तींच्या भविष्याची काळजी घेणे, ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी भेट असते. साधारणपणे, आपण मुलांना खेळणी अथवा महागडे गॅझेट देतो. मात्र, ते फार काळ टिकत नाही. त्याऐवजी वित्तीय भेट देणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.
नाताळ सणानिमित्त तुम्ही स्मार्ट सँटा होवून मुलांना बचतीचा प्लॅन देवून चांगली भेट देवू शकता.
बचत करणे खूप छान गोष्ट आहे. विशेषत: जेव्हा तुमच्या पालकांनी तुमच्यासाठी बचत केलेली असते, तेव्हा.
-विन्स्टन चर्चिल
तर चला पाहू वित्तीय भेट देण्याचे चांगले ५ पर्याय
- पिग्गी बँक - मुलांना बचतीची सवय लावून देण्यासाठी पिग्गी बँकची भेट चांगली ठरू शकते. त्यामध्ये काही नाणी ठेवणे अथवा पैसे ठेवण्याची सवय मुलांना लागू शकते. त्यामुळे त्यांना पैशांचे मूल्य समजू शकते.
- महाविद्यालय प्रवेश अथवा लग्नासाठी एसआयपी- तुम्ही मुलांचे भविष्यात लग्न अथवा शिक्षणाचा खर्च लक्षात घेवून सिस्टॅमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) निवडू शकता. हा प्लॅन मुलाचे वय, तुमचा हप्ता अथवा वार्षिक रक्कम याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता.
- डेबिट म्युच्युअल फंड - जर तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणुकीची भेट देणार असाल तर म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. निवडलेल्या म्युच्युअल फंडचा कालावधी आणि प्लॅनची मुलांना माहिती द्या. तुमच्या मुलांना संयम ठेवण्याची सवय लावण्याचा हा चांगला पर्याय ठरू शकतो.
- ब्ल्यू चिप कंपन्यांचे शेअर- नामांकित कंपन्यांचे शेअर मुलाला भेट म्हणून द्या. शेअर कसे काम करतात हे त्यांना समजावून सांगा. तुम्ही मुलांना माहित असलेल्या कंपनीचे शेअर निवडू शकता. यामध्ये मोबाईल कंपनी, मूव्ही स्टुडिओ यांचा समावेश होवू शकतो. लहान मुले शेअर खरेदी करू शकत नाहीत. पण त्यांच्या नावाने पालक म्हणून कस्डोडिअल खाते काढू शकता.
- गोल्ड इटीएफ - सोने भेट देणे ही खूप महागडी भेट आहे. तसेच मोठ्या गुंतवणुकीचा पर्याय आहे. भौतिक सोन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा गोल्ड इटीएफचा चांगला पर्याय आहे. यामध्ये इतर मालमत्तेहून अधिक परतावा मिळू शकतो.
(इंदू चौधरी यांचा लेख, वैयक्तिक वित्तीय तज्त्र)