नवी दिल्ली - कोरोनाची दुसरी लाटेवर कंपन्यांचे शून्य नियोजन असल्याचे समोर आले आहे. कंपन्यांचे ४२ टक्के चिफ ऑपरेटिंग ऑफिसरने (सीएफओ) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी नियोजन नसल्याचे सर्वेक्षणात सांगितले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकरता केवळ ८ टक्के सीएफओने नियोजन केल्याचे गार्टनरच्या सर्वेक्षणामधून समोर आले आहे. कंपन्यांच्या चिफ ऑपरेटिंग ऑफिसरपैकी केवळ २२ टक्क्के जणांना कोरोनाची दुसरी लाट येईल, असे वाटते. याचा अर्थ बहुतांश कंपनीचे अधिकारी कोरोनाच्या संकटावर तयार नाहीत. अनेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण कामकाज सुरू झाल्यास काळजी घेण्याची गरज वाटते. गार्टनर फायनान्स प्रॅक्टिसचे (संशोधन) उपाध्यक्ष अलेक्झांडर बँट यांनी म्हटले, की २०२० मध्ये विविध प्रकल्पांमधून महसूल आणि नफा मिळविण्याचा सीएफओ यांचा प्रयत्न आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी ४२ टक्के सीएफओ यांनी नियोजन केले नाही, हे आश्चर्यकारक आहे.
हेही वाचा-देशाचा बहुमान! किरण मुझुमदार यांची सलग सहाव्यांदा 'या' यादीत निवड