हैदराबाद - कोरोनाची महामारी ही भारतीय उद्योगासाठी कठोर परिक्षा ठरत आहे. या स्थिती अमूलने शेतकऱ्यांकडून खरेदी आणि ग्राहकांना विक्री करण्याचे प्रमाण वाढविले आहे. हे संतुलन कसे साधले याविषयी माहिती अमूलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर. एस. सोधी यांनी ईटीव्ही भारतने घेतलेल्या मुलाखतीत दिली.
आर. एस. सोधी म्हणाले, की आमचा संपूर्ण व्यवसाय दुधावर अवलंबून आहे. रोज एकवेळ (पूर्वी दोन वेळ) ३६ लाख शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्यात येते. ही खरेदी नेहमीपेक्षा १५ टक्के अधिक आहे. लहान विक्रेते, लहान दूध डेअरी व्यवसायिक व मिठाई विक्रेते यांनी गुजरात व गुजरातबाहेर दूध खरेदी करणे थांबविले आहे. त्यामुळे शेतकरी अमूलमध्ये जास्तीत जास्त दूध विक्रीला देत आहेत.
कामगारांच्या सुरक्षिततेसाठी अनेक मार्गदर्शक सूचनांचे पालन-
कंपनीने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक मार्गदर्शक सूचनांचे पालन १७ मार्चपासून म्हणजे टाळेबंदीच्या घोषणेपूर्वी आठ दिवसांपासून सुरुवात केली आहे. गुजरात आणि गुजरातबाहेरील सर्व १८,५०० दूध संकलक आणि शेतकऱ्यांना सुरक्षित उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे.
दिल्ली, मुंबई व कोलकात्यात कामगार मिळण्यात अडचणी-
दिल्ली, मुंबई, कोलकाता, कानपूर आणि लखनौ या महानगरांमध्ये कामगार मिळणे ही सर्वात मोठी समस्या असल्याचे लोधी यांनी सांगितले. लोक घरातच थांबत असल्याने दुधाच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला लोकांना दूध खरेदी करण्याची चिंता वाटत होती. त्यावेळी दुधाच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर चौथ्या दिवशी दुधाच्या विक्रीत ३० टक्के घट झाली होती. कारण हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर दुकाने बंद असल्याने विक्री घटली होती. दुसरे कारण म्हणजे चिंतेने वाढलेली खरेदी थांबली आहे. सध्या, हॉटेल बंद असूनही दूध विक्री केवळ सात ते आठ टक्क्यांनी कमी झाली आहे. दही, तूप, लोणी, चीज हे घरगुती पदार्थ तयार करण्यासाठी २० टक्के दुधाच्या विक्रीत वाढ झाली आहे.
हेही वाचा-केंद्र सरकारच्या आदेशाला हरताळ; विमान कंपन्यांकडून तिकीट बुकिंग सुरू
ऑनलाईन विक्रीत ३० ते ४० टक्क्यांची वाढ-