महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / budget-2019

Union Budget 2022 Health : केंद्रीय अर्थसंकल्पात मानसिक आरोग्य क्षेत्रात मोठी तरतूद

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( union minister nirmala sitharaman ) ह्या संसदेत अर्थसंकल्प 2022 ( union budget 2022 ) सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. दरम्यान यावेळीदेखील अर्थमंत्री पेपरविना अर्थसंकल्प मांडत आहेत. अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आरोग्य क्षेत्रावर विशेष भर दिला आहे.

Union Budget 2022 Health
केंद्रीय अर्थसंकल्पात मानसिक आरोग्य क्षेत्रात मोठी तरतूद

By

Published : Feb 1, 2022, 11:58 AM IST

Updated : Feb 1, 2022, 2:45 PM IST

नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( union minister nirmala sitharaman ) ह्या संसदेत अर्थसंकल्प 2022 ( union budget 2022 ) सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. दरम्यान यावेळीदेखील अर्थमंत्री पेपरविना अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आरोग्य क्षेत्रावर विशेष भर दिला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्यासाठी केलेली तरतूद
  • 23 मानसिक समस्या समुपदेशन केंद्र उभारण्यात

जगात सुरु असलेल्या कोरोना महामारीने लोकांचे मानसिक आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने मानसिक आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे. मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्यावर होत असलेला परिणाम पाहता केंद्रीय अर्थसंकल्पात मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी देशात 23 मानसिक समस्या समुपदेशन केंद्र उभारण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.

  • आरोग्यातील तरतूदी -

राष्ट्रीय डिजिटल हेल्थ इकोसिस्टम आणली जाणार आहे. एकात्मिकरित्या मिशन शक्ती, मिशन वासल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोशन 2.0 हे राबवले जाणार आहेत. दोन लाख अंगणवाड्या सक्षम अंगणवाड्यांमध्ये सुधारित श्रेणी आणणार आहेत, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

हेही वाचा -UNION BUDGET 2022 UPDATE : सार्वजनिक निधी करिता गुंतवणूक आणि खर्चावर अर्थसंकल्पात मोठी वाढ करण्यात येईल - निर्मला सीतारामन

Last Updated : Feb 1, 2022, 2:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details