गोंदिया- नवरात्रीच्या पर्वावर डव्वा गावात महिलांना दुर्गा देवीचा अवतार पहायला मिळाला आहे. गावात दारू बंदी असतानाही अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याला पकडून जाब विचारायला गेलेल्या महिलांवर त्यात दारू विक्रेत्याने चाकू काढून भीती दाखवायचा प्रयत्न केला असता. महिलांनी दारू विक्रेत्याला चांगला चोप दिल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील डव्वा या गावात घडली आहे. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात दारू विक्रेत्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील डव्वा येथे अवैध दारूविक्रेत्यांमुळे व्यसनाधिनतेच्या प्रमाणात वाढ होत आहे. एवढेच नाहीतर महिला व मुलींच्या सुरक्षतेचे प्रश्नही निर्माण झाले. यामुळे दारूबंदी महिला समितीच्या वतीने डव्वा येथे दारूबंदीचे आवाहन करण्यात आले. त्या अनुषंगाने 6 ऑक्टोबरला गावात दवंडीच्या माध्यमातून अवैध दारू विक्रेत्यांसह दारू पिणाऱ्यांना दारूबंदी मोहिमेत सहभागी व्हावे, या आवाहनासह अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी, अशी ताकीद देण्यात आली. असे असतानाही दोन व्यक्ती बसस्थानकाजवळ अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची माहिती समितीच्या महिलांना मिळाली.