महाराष्ट्र

maharashtra

खबरदार ! ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना शहरी रुग्णालयात बंदी घालाल तर..

By

Published : Jul 6, 2020, 10:24 PM IST

जिल्हा सामान्य रुग्णालयावर संपूर्ण ठाणे जिल्ह्याची जबाबदारी आहे. मात्र तिथेही सध्या ठाणे शहराच्या बाहेरील रुग्णांना प्रवेश नाकारला जातो. ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग कोरोणा संकटाला सामोरा जात असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी शासन व प्रशासनाच्या या आडमुठ्या फतव्यांमुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये आता संताप व्यक्त केला जात आहे. असे आमदार किसन कथोरे यांनी आपल्या पत्रात मांडले.

Thane hospitals
Thane hospitals

ठाणे- कोरोना सारख्या महामारीत ग्रामीण भागातील रुग्णांना शहरातील रुग्णालयात बंदीचा फतवा काढणाऱ्या प्रशासनाच्या अमानवीय कृतीबद्दल ग्रामीण जनतेत तिव्र संताप व्यक्त होत आहे. भविष्यात ग्रामीण विरुद्ध शहरी असा संघर्ष पेटून ग्रामीण जनता आपल्या भागातून शहरी भागात जाणारे पाणी बंद करतील. असा लेखी इशारा मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात आमदार किसन कथोरे यांनी दिला आहे.

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व औद्योगिक वसाहती यांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जमिनी संपादित करून व शेतकऱ्यांचे पुनर्वसन अर्धवट ठेवूनसुध्दा मुंबईसह ठाणे, भिवंडी, मिरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नवीमुंबई या महानगरपालिका व अंबरनाथ व कुळगाव बदलापूर या नगरपालिका व औद्योगिक वसाहती या क्षेत्राला मुरबाड, शहापूर व अंबरनाथ या तालुक्यातील ग्रामीण भागात धरणे बांधून आणि येथील शेतकऱ्यांचे अर्धवट विस्थापन करून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांमधून ग्रामीण भागातील एकाही गावाला पाणीपुरवठा केला जात नाही. शिवाय या महानगरपालिकांचा या ग्रामीण भागाला काहीही उपयोग नाही. या महानगरपालिकांनी आपले स्वतःचे अस्तित्व जोपासण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांसाठी राज्य सरकार, महापालिका व एमएमआरडीए यांच्या माध्यमातून मोठमोठी रुगणालये उभारण्याचे काम केले आहे. सर्व सोईसुविधायुक्त या रुग्णालयात केवळ महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचाच अधिकार ( हक्क ) आहे. असे फतवे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी काढले असल्याचे भाजप आमदार किसन कथोरे म्हणाले.

या उलट ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात ना डॉक्टर ना औषधे व रुग्णवाहिका आहेत. जर एखादा रुग्ण गंभीररीत्या आजारी झाल्यास त्याला पुढील उपचारासाठी महानगरपालिका रुग्णालयात हलविण्यात येते. वास्तविक पाहता रुग्णाची कोणतीही चौकशी न करता त्याला दाखल करून त्याच्यावर त्वरित उपचार सुरू करणे गरजेचे असताना तो ग्रामीण भागातून आला असल्याचे कारण देत त्याला दाखल करून घेतले जात नाही. परिणामी अशा अनेक रुग्णांवर मृत्यूची वेळ ओढवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मानसिकता खचत असून मनात तिव्र संताप व्यक्त होत आहे, असे भाजप आमदार किसन कथोरे म्हणाले.

जिल्हा सामान्य रुग्णालयावर संपूर्ण ठाणे जिल्ह्याची जबाबदारी आहे. मात्र तिथेही सध्या ठाणे शहराच्या बाहेरील रुग्णांना प्रवेश नाकारला जातो. ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग कोरोणा संकटाला सामोरा जात असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी शासन व प्रशासनाच्या या आडमुठ्या फतव्यांमुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये आता संताप व्यक्त केला जात आहे. भविष्यात कोरोणाच्या या प्रश्नावरून शहराकडे जाणारे पाणी अडवून ग्रामीण व शहरी हा संघर्ष जास्त विकोपाला जाण्यापेक्षा मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव यांनी याबाबतीत त्वरित लक्ष देणे गरजेचे असल्याचे मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी लेखी पत्र पाठवून इशारा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details