महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

गुप्त मतदान प्रक्रियेला हरताळ.. सोशल मीडियावर ईव्हीएमवर मत देतानाचे फोटो व्हायरल - गुप्त

अनेक मतदारांनी ईव्हीएम मशिनवर मतदान करत असल्याचे हे फोटो व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर व्हायरल केले आहेत.

सोशल मीडियावर ईव्हीएमवर मत देतानाचे फोटो व्हायरल

By

Published : Apr 19, 2019, 10:47 AM IST

अमरावती- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरूवारी पार पडले. मतदान हे गुप्त असावे असा नियम असताना अनेक उत्साही मतदार तरुण -तरुणींनी या नियमांना धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास तसेच फोटो, चित्रिकरण करण्यास बंदी असताना अनेक मतदारांनी त्यांचे ईव्हीएमवर मत देतानाचे फोटो काढले असून सोशल मीडियावर हे फोटो सध्या व्हायरल केले आहेत.

तसेच डमी मतपत्रिकेवर नवनीत राणांसह आणखी एका उमेदवाराच्या नावापुढे कॅन्सलचा शिक्का मारून तो फोटो व्हायरल केल्याचा गंभीर प्रकार काल समोर आला. हा शिक्का कुणी मारला हे कळले नसले तरी तो व्यक्ती तिथे पोहोचला कसा?? निवडणूक प्रक्रिया पार पाडणारे कर्मचारी कुठे गेले होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या तरुणांवर निवडणूक आयोग काय कारवाई करणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक मतदारांनी ईव्हीएम मशिनवर मतदान करत असल्याचे हे फोटो व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर व्हायरल केले आहेत. त्यामुळे गुप्त मतदान करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. मतदान कोणाला करावे याचा सर्वस्वी निर्णय मतदाराचा आहे. मात्र, ते कोणाला केले हे इतरांना कळू नये तसेच मतदारालाही कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी ईव्हीएमच्याभोवती बॉक्स केले जाते. तसेच मतदाराने मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांकडून सूचना करण्यात येतात. असे असताना अनेक मतदारांनी उत्साहाच्या भरात मतदान करतानाचे फोटो काढले असून हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मात्र अतिउत्साही तरुणांनी मतदान केंद्रावर मोबाईल नेऊन ईव्हीएम मशिनवर बोट ठेऊन त्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. या फोटोत ईव्हीएम मशीनसोबत बोट व मत कोणाला दिले हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details