मुंबई - सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच एक्झिट पोलचे अंदाजही वर्तवण्यात येत आहेत. यावरूनच विवेकने ऐश्वर्यासोबतचा असलेला एक मीम सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावरुन बराच वाद तयार झाला आहे. महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवण्यापर्यंत हा वाद पुढे गेलाय. यानंतर विवेकने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनेकांनी त्याला माफी मागण्याचा सल्ला दिला होता. यावर विवेक म्हणतो, "लोक मला माफी मागण्याचा सल्ला दते आहेत., मला माफी मागण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला सांगा मी काय चुकीचे केले ? जर मी काही चुकीचे केले असेल तर मी माफी मागेन. मी काही चुकीचे केलेय असे मला वाटत नाही. काय चुकीचे आहे त्यात ? कोणीतरी मिम बनवले आणि मी त्यावर हसलो, बस इतकेच."
तो पुढे म्हणाला, "लोक या गोष्टीचा का इतका मोठा इश्यू करीत आहेत, हे मला कळत नाही. कोणीतरी मला फनी मिम पाठवले. मी त्याच्यावर हसलो, त्या व्यक्तीच्या क्रिएटीव्हीटीला मी दाद दिली. कोणीतरी तुमची मस्करी करीत असेल तर त्याला गंभीरपणे घेतले जाऊ नये."