महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

विजय यादव देणार भारतीय खेळाडूंना क्षेत्ररक्षणाचे धडे - vijay-yadav-appoints-as-fielding-coach-of-team-india-a-by-bcci

सध्या ते हरियाणा संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

विजय यादव

By

Published : May 18, 2019, 10:58 AM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट बोर्डाने हरियाणा रणजी संघाचे प्रशिक्षक विजय यादव यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिली आहे. विजय यादव हे भारत 'अ' संघास क्षेत्ररक्षणाचे धडे देणार आहे. त्यांची भारत 'अ' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने गुरुवारी विजय यादव यांच्या नियुक्तीची घोषणा केली.


विजय यादव श्रीलंका 'अ' संघासोबत होणाऱ्या ५ एकदिवसीय आणि तीन ४ दिवसीय कसोटी सामन्यांत भारतीय 'अ' संघाला मार्गदर्शन करतील. विजय यादव माजी भारतीय क्रिकेटर आहेत. त्यांना यष्टीरक्षक म्हणून झिम्बाब्वे विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.


विजय यादव यांनी १९ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. सध्या ते हरियाणा संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details