महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्या पवारांना पंतप्रधान करणार का, उद्धव ठाकरेंची कडवट टीका

ठाकरे म्हणाले, की सोनिया गांधी यांनी लाथाडल्यावर शरद पवारांनी नवीन पक्ष स्थापन केला. पण, नंतर पवार त्यांच्यासोबतच का गेले. यावेळी ठाकरेंनी मायावती आणि राहुल गांधींवरही टीका केली.

उद्धव ठाकरे

By

Published : Apr 10, 2019, 9:40 AM IST

मुंबई- सध्या सर्वच नेते पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी उत्सूक आहेत. भूखंडाचे श्रीखंड खाणारे, गोवारिंना गोळी मारणारे, वसंतराव नाईकांच्या पाठीत खंजीर खुपसणारे, शर्मा बंधुंना हेलिकॉप्टरमधून फिरवणारे शरद पवार पंतप्रधानपदी चालतील का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

ठाकरे म्हणाले, की सोनिया गांधी यांनी लाथाडल्यावर शरद पवारांनी नवीन पक्ष स्थापन केला. पण, नंतर पवार त्यांच्यासोबतच का गेले. यावेळी ठाकरेंनी मायावती आणि राहुल गांधींवरही टीका केली. शिवसेनेने भाजपशी युती केल्यामुळे अफजलखानाच्या शामियान्यात ठाकरे गेले, अशी टीका पवारांनी केली होती. त्याला ठाकरेंनी प्रती टीका करुन उत्तर दिले.

ठाकरेंनी शिवसेना आणि भाजपच्या युतीचे समर्थन केले. हे दोन्ही पक्ष एकाच विचाराचे आहेत. आम्ही चोरुन पाठिंबा नाही दिला. तर उघड दिला. उघडपणे अमित शहांच्या व्यासपिठावर गेलो. तुमची विचारसरणी काय, असा प्रश्न ठाकरेंनी काँग्रस, राष्ट्रवादीला दिला. राहुल गांधींच्या गरिबी हटाव घोषणेवरही त्यांनी टीका केली.

ABOUT THE AUTHOR

...view details