नांदेड -शनिवार (6 जून) अखेर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 190 झाली आहे. यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या दोन रुग्णांचा दुसरा अहवाल सुद्धा पॉझिटीव्ह आला आहे. तर दिवसभरात एका रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 190 वर जावून पोहोचली आहे.
जिल्ह्यातील प्राप्त झालेल्या 75 अहवालांपैका 59 रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 12 रूग्णांचे अहवाल नाकारण्यात आले. एका रूग्णाचा अहवाल अनिर्णित आला असून 3 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये फेर तपासणीमध्ये एका 23 व 80 वर्षांच्या व्यक्तीचा दुसरा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. तर इतवारा येथील हनुमान टेकडी परिसरातील एक रुग्णाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 190 वर जावून पोहोचली आहे. आतापर्यंत 126 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 56 जणांवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत, कोरोनामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये दोन महिला ज्यांचे वय 52 व 65 तसेच दोन पुरुषांचे वय हे 38 व 65 इतके आहे.
नांदेड जिल्ह्यातील आजपर्यंतची कोरोनाची परिस्थिती
- आत्तापर्यंत एकूण संशयित - 4353
- एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4111
- क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2279
- अजून निरीक्षणाखाली असलेले - 105
- पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 104
- घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4007
- आज घेतलेले नमुने - 19
- एकुण नमुने तपासणी- 4381
- एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 190
- पैकी निगेटीव्ह - 3915
- नमुने तपासणी अहवाल बाकी- 19
- नाकारण्यात आलेले नमुने - 78
- अनिर्णित अहवाल – 172
- कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 129
- कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 8
जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवाशांची संख्या ही 1 लाख 42 हजार 845 इतकी आहेत. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.