पुणे - शहरात आज दिवसभरात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. तर, नव्याने कोरोनाची लागण झालेले 304 रुग्ण सापडले आहेत. तर, आज कोरोनामुक्त झालेल्या 271 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुण्यात दिवसभरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, 271 जणांना डिस्चार्ज, 304 रुग्णांची भर - पुणे कोरोना आकडेवारी
पुण्यात आज 3 जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून 271 व्यक्तींना उपचारानंतर बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बाधितांचा आकडा 8 हजारांवर जाऊन पोहोचला आहे.
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची लागण झालेले 8 हजार 509 रुग्ण सापडले आहे. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 5 हजार 575 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बरे झालेल्या 271 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 2 हजार 528 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 406 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आठ हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत आहे. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.