महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

ही आकडेवारी सांगते आंद्रे रसेलच आहे डेथ ओव्हरमधील किंग

डेथ ओव्हरमध्ये त्याने ५४ चेंडूत १७० धावा कुटल्या आहेत. त्यात २२ षटकारांपैकी १८ षटकार डेथ ओव्हरमध्ये मारले आहेत.

आंद्रे रसेल

By

Published : Apr 7, 2019, 5:21 PM IST

मुंबई - कोलकाता आणि बंगळुरू यांच्यातील सामना होऊन बरेच दिवस झाले, तरीही आंद्रे रसेलने ईडन गार्डन्सवर केलेल्या १३ चेंडूत नाबाद ४८ धावांची चर्चा आजही होत आहे आणि पुढेही होत राहिल. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचे नवे रुप क्रिकेटप्रेमीनां पाहयला मिळाले. त्याच्या धावापाहून त्याला आता डेथ ओव्हरमधली यूनिवर्स बॉस म्हणू लागले आहे.

रसेलच्या आधी हे नाव विंडीजच्या ख्रिस गेल यास दिले आहे. शेवटच्या काही षटकात रसेलची खेळी पाहून लोक रसेलला यूनिवर्स बॉस म्हणू लागले. या हंगामात ४ सामन्यात १०३.५० च्या सरासरीने १ अर्धशतक ठोकत त्याने २०७ धावा केल्या आहे. त्यात १२ चौकार आणि २२ षटकारांचा समावेश आहे. डेथ ओव्हरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आंद्रे रसेलने शेवटच्या षटकात विरोधी संघाच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला आहे.

डेथ ओव्हरमध्ये त्याने ५४ चेंडूत १७० धावा कुटल्या आहेत. त्यात २२ षटकारांपैकी १८ षटकार डेथ ओव्हरमध्ये मारले आहेत. तसेच त्यात ११ चौकारांचाही समावेश आहे. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट ३१४.८१ आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details