लखनौ -बसप अध्यक्ष मायावती केस काळे करून स्वतःला तरुण दाखवण्याचा प्रयत्न करतात, असे आक्षेपार्ह विधान भाजपचे आमदार सुरेद्र नारायण सिंह यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाने राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. पक्ष कार्यालयात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी हे विधान केले.
मायावती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान मोदी यांच्या राहणीमाणावर टीका केली होती. नरेंद्र मोदी हे साधे जीवन आणि उच्च विचारांच्या विरोधाभासी म्हणजेच शाही अंदाजात जगतात. मागच्या निवडणुकांमध्ये मतदान मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःला 'चायवाला' म्हणून प्रचारीत केले होते. त्यानंतर यावेळी मोठी तयारी आणि शान सहीत स्वतःला चौकीदार म्हणून घोषित केले आहे. देश खरच बदलत आहे का? असा तो मायावतींचा ट्विट होता.