महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

हैदराबादचा राजस्थानवर ५ गडी राखून विजय, संजू सॅमसनची शतकी खेळी निष्फळ - Sanju Samson

संजू सॅमसन याचीही बॅट या सामन्यात चांगलीच तळपली. त्याने हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ५५ चेंडूत १०२ धावा केल्या. त्यात १० चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली.

राजस्थान- हैदरबाद संघातील खेळाडू

By

Published : Mar 29, 2019, 7:55 PM IST

Updated : Mar 30, 2019, 12:01 AM IST

हैदराबाद-राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा ५ गडी राखून पराभव केला. राजस्थानने हैदराबाद समोर १९९ धावांचे आव्हान दिले आहे. हैदराबादने हे आव्हान १९ व्या षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. राजस्थानच्या संजू सॅमसनची शतकी खेळी व्यर्थ ठरली.

१९९ धावांचे डोंगराएवढे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादने तडाकेबाज सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉन बेयस्टो यांनी शतकी भागीदारी केली. दोघांनी मिळून पहिल्या गड्यासाठी ११० धावांची भागीदारी रचली. डेव्हिड वॉर्नरने ३७ चेंडूत ६९ धावा झोडपल्या. त्यात ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. जॉनी बेयस्टोने ४५ धावांचे योगदान दिले. कर्णधार केन विलियमन्स याला कर्णधाराला साजेशी खेळी करता आली नाही. तो १४ धावा काढून स्वस्तात माघारी परतला.

श्रेयस गोपालने सलग दोन चेंडूत विजय शंकर आणि मनीष पांडेला बाद करुन हैदराबादच्या चिंतेत वाढ केले. त्यानंतर युसूफ पठाण अधिक पडझड न होऊ देता संघास विजय मिळवून दिला. युसूफ पठाण १६ तर राशिद खान १५ धावांवर नाबाद राहिले.

राजस्थानकडून श्रेयस गोपालने जादुईने फिरकीने २७ धावा देत ३ फलंदाजांना माघारी धाडले. बेन स्टोक्स आणि जयदेव उनाडकट यांना प्रत्येकी १ गडी बाद करता आला.

राजस्थान रॉयल संघाचा कर्णधार अंजिक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने संजू सॅमसन याच्या शतकी खेळाच्या जोरावर करताना २० षटकात २ बाद १९८ धावा रचल्या. संजू सॅमसन याची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली. त्याने हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ५५ चेंडूत १०२ नाबाद धावा केल्या. त्यात १० चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली.

पहिल्या सामन्यात स्फोटक खेळी करणारा जोस बटलरला या सामन्यात करिष्मा दाखविता आला नाही. त्याला ५ धावांवर राशिद खानने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी सामन्याची सूत्रे हाती घेतली.अजिंक्यने ४९ चेंडूत झटपट ७० धावा कुटल्या. त्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. अजिंक्य आणि संजू या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ११९ धावांची भागीदारी केली. शहबाज नदीम याने अजिंक्यला बाद करत ही जोडी फोडली.हैदराबादकडून राशिद खान आणि नदीम यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला. इतर गोलंदाज निष्प्रभ ठरले

Last Updated : Mar 30, 2019, 12:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details