मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी दिलासा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीचा मोफत प्रवास आता बंद होणार आहे. 3 जुलैपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवास करताना प्रवासी भाडे देऊन प्रवास करावा लागणार आहे, तसे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा एसटीचा मोफत प्रवास उद्यापासून बंद - Free s.t bus transport stopped
मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली एसटीची मोफत सेवा बंद करण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे.
मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली एसटीची मोफत सेवा बंद करण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे. त्या पत्रावरून एसटी महामंडळाने 3 जुलैपासून एसटीतून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवतील कर्मचाऱ्यांकडून प्रवासी भाडे घेण्याचे आदेश मुंबई, पालघर, ठाणे विभाग नियंत्रकांना दिले आहेत.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना गेले 2 महिने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीतून मोफत प्रवास सुरू होता. लॉकडाऊन कालावधीत सरकारी कर्मचारी, पोलीस, पालिका कर्मचारी, शासकीय रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळ व बेस्ट उपक्रमाकडून विशेष गाड्या चालवण्यात आल्या. या एसटी बस कल्याण-डोंबिवली, पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, नालासोपारा, वसई, बदलापूर येथून मुंबईच्या दिशेने सोडण्यात आल्या आहेत.