महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींचे मानधनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन - Nursing college girls protest

सकाळी 11 च्या सुमारास सोलापूरमधील नर्सिंग मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मानधन वाढीसाठी व थकीत मानधन मिळावे या प्रमुख मागण्यासह निवेदनाचा अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व विद्यार्थीनींना ताब्यात घेतले.

आंदोलक विद्यार्थीनी
आंदोलक विद्यार्थीनी

By

Published : Jul 11, 2020, 6:44 PM IST

सोलापूर- शहरातील नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींनी आज (शनिवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कोरोना काळात काम केल्याचा आजपर्यंत मोबदला मिळाला नाही, तसेच शासनाकडून सुरक्षा दिली नाही, ती देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेल्या 100 विद्यार्थीनींना ताब्यात घेतले.

सकाळी 11 च्या सुमारास सोलापूरमधील नर्सिंग मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मानधन वाढीसाठी व थकीत मानधन मिळावे या प्रमुख मागण्यासह निवेदनाचा अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व विद्यार्थीनींना ताब्यात घेतले.

आंदोलक विद्यार्थीनींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला अश्वासन दिले होते, मानधन देण्यात येईल. परंतु आजतागायत मानधन मिळाले नाही. उलट कोविडच्या ड्युटीवर जाताना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

व्हॅनमध्ये कोरोना होत नाही का?

पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर विद्यार्थीनी आणखीनच आक्रमक झाल्या. एकाच पोलीस गाडीत सर्व विद्यार्थिनींना बसविण्यात आले. आत व्हॅनमध्ये कोरोना होत नाही का? असा सवाल त्यांनी पोलिसांना केला.

आंदोलक विद्यार्थीनींच्या प्रमुख मागण्या

कोरोना काळात काम केलेले मानधन त्वरीत मिळावे. पीपीई किट देण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी व येण्यासाठी बसची व्यवस्था करावी. तपासणीसाठी गेल्यावर नागरिक आमचा छळ करत आहेत, त्यापासून सुरक्षा देण्यात यावी. स्वतः च्या दुचाकीवरून जाताना पोलीस कारवाई होत आहे. ती पोलीस कारवाई रोखावी.

ABOUT THE AUTHOR

...view details