नवी दिल्ली- अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने असगर अफगाणकडून कर्णधार पदाची जबाबदारी काढून घेतली आहे. आता ही जबाबदारी लेग स्पिनर राशिद खानच्या खांद्यावर दिली आहे. राशिद खान आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे.
एसीबीने शुक्रवारी त्याच्या निवडीची माहिती ट्विटर अकाउंटवरुन दिली. बोर्डाने सांगितले की, असगर याच्याकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.
एसबीने गुलबदिन नैब यास एकदिवसीय तर राशिद खान यास टी २० आणि रहमत शाह यास कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. त्याचसोबत राशिद यास एकदिवसीय उपकर्णधारपदही देण्यात आले. तर शफीकउल्लाह शफीक यास टी-२० तर हशमतउल्लाह शाहिदी यास कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी वर्णी लागली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून एकदिवसीय संघाचे नेतृत्व नैबकडे सोपविण्यात आले. यंदाच्या विश्वचषकात उप कर्णधारपद राशिद खान सांभाळेल. यापूर्वी राशिद खान चार एकदिवसीय सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. राशिदचे वय अवघे २० वर्ष आहे.