महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

फिरकी गोलंदाज राशीद खानचे फुटबॉलवरही नियंत्रण, पाहा Video - rashid khan amazing stunt with football watch video

राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात राशिदला सामनावीर किताबाने गौरविण्यात आले.

राशिद खान

By

Published : Mar 30, 2019, 8:14 PM IST

हैदराबाद - अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिदा खानने आपल्या जादुई फिरकीने जगभर चाहते निर्माण केले आहेत. आजपर्यंत आपण तो क्रिकेटमध्ये चेंडूवरची त्याने केलेली करामत पाहिलीच आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याचे फुटबॉलवरचे नियंत्रण पहिल्यांदाच पाहायला मिळाले.

त्याचे हे नियंत्रण पाहून सारेच चकित झाले आहे. राशिद खान हा फुटबॉलचाही चाहता आहे. आयपीएलच्या ऑफिशियल ट्वीटर पेजवर राशिदचा एका बोटावर फुटबॉल फिरवतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडत आहे.

राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात राशिदला सामनावीर किताबाने गौरविण्यात आले. गोलंदाजीत त्याने ४ षटकांत २४ धावा देत जोस बटलरचा महत्वपूर्ण बळी घेतला आणि फलंदाजी करताना जोफरा आर्चरच्या २ चेंडूत १० धावा काढून संघास विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

For All Latest Updates

TAGGED:

rashid khan

ABOUT THE AUTHOR

...view details