बारामती (पुणे) - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बारामती येथील गोविंद बाग निवास्थानी अचानक भेट घेतली. या बैठकीत राजू शेट्टी हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती होती.
अखेर राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होणार; गोविंद बागेत शरद पवार अन् शेट्टींची भेट
माजी खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होणार हे आता स्पष्ट झाले आहे. बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यात झालेल्या चर्चेअंती शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा आमदारकीचा प्रस्ताव मान्य केला आहे. शेतकरी संघटनेचे बारामतीचे ज्येष्ठ नेते सतीश काकडे यांनीही याला दुजोरा दिला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होणार हे आता स्पष्ट झाले आहे. बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यात झालेल्या चर्चेअंती शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा आमदारकीचा प्रस्ताव मान्य केला आहे. शेतकरी संघटनेचे बारामतीचे ज्येष्ठ नेते सतीश काकडे यांनीही याला दुजोरा दिला आहे. बारामतीतील पवार यांच्या गोविंद बागेतील निवासस्थानी माजी खासदार राजू शेट्टी, सतीश काकडे, राजेंद्र ढवाण यांची बैठक झाली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या. राजू शेट्टी यांनी बैठकीदरम्यान आमदारकीचा प्रस्ताव मान्य केल्याचे समजते.
मंगळवारी खुद्द पवारांनी बारामती पंचक्रोशीतील विविध शेतीचे प्रयोग, कृषी विज्ञान केंद्र, सेंटर ऑफ एक्स्लेन्स यांची माहिती शेट्टी यांना दिली. तब्बल दोन तासांहून अधिक काळ पवार यांनी स्वत:च्या गाडीतून शेट्टी यांना फिरवत या परिसरात सुरु असलेल्या नवीन शेतीच्या प्रयोगांबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकत्रितरित्या राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकी देण्याचे निश्चित केले आहे. राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे आता पवार आणि शेट्टी यांचे मैत्रीपर्व नव्याने सुरु होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.