महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन - अकोला बातमी

राज्यात वाढत असणाऱ्या मागासवर्गीय, बौद्ध व भटक्या विमुक्त जमातीवर अन्याय वाढत आहे. मागासवर्गीयांवरील अन्याय रोखण्यात शासन अपयशी ठरत आहे. अत्याचारांच्या या घटनांमध्ये वारंवार वाढ होत आहे. या अत्याचारांचा जाब सरकारला विचारण्यासाठी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन महाआघाडी यांच्यासह इतर संघटनांनी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पुकारले आहे.

akola news
akola news

By

Published : Jun 16, 2020, 3:52 PM IST

अकोला -राज्यातील वाढत्या मागासवर्गीयांवरील अत्याचारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पुकारण्यात आले आहे. भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारिप बमसं युवक आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी, फुले आंबेडकर विद्वत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. 17 जूनला जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

राज्यात वाढत असणाऱ्या मागासवर्गीय, बौद्ध व भटक्या विमुक्त जमातीवर अन्याय वाढत आहे. हे अन्याय रोखण्यात शासन अपयशी ठरत आहे. अत्याचारांच्या या घटनांमध्ये वारंवार वाढ होत आहे. या अत्याचारांचा जाब सरकारला विचारण्यासाठी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन महाआघाडी यांच्यासह इतर संघटनांनी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात निवेदन देण्यात येणार आहे. अकोल्यात प्रदीप वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details