चंडीगड - देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मात्र, या दरम्यान मद्य विक्री दुकानांसह इतर काही दुकाने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. हरियाणामध्येही आजपासून दारूविक्री करण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनी सकाळपासूनच दुकानांच्या बाहेर लांबच-लांब रांगा लावल्या होत्या. हरियाणातील मद्यविक्री दुकानांमध्ये लॉकडाऊनच्या नियामांचे पालन होत असल्याचे सारासार चित्र आहे.
गुरुग्राममध्ये होत आहे सोशल डिस्टन्सिंगचे पालन गुरुग्राममध्ये होत आहे सोशल डिस्टन्सिंगचे पालन -
गुरुग्राममध्ये सकाळपासूनच दारूची दुकाने उघडण्यात आली आहेत. दुकानदारांनी दुकानांच्याबाहेर लाकडी खांब लावून आणि चुन्याने मार्किंग करुन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची खबरदारी घेतली आहे.
सिरसामध्ये मद्यविक्री दुकानांजवळ पोलीस तैनात - सिरसामध्ये मद्यविक्री दुकानांजवळ पोलीस तैनात -
सिरसामध्ये सर्व दुकानांच्याबाहेर पोलीस ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत दारूची खरेदी केली. दारूचे दर पहिल्यापेक्षा वाढले आहेत, मात्र पिणाऱयांवर याचा काही परिणाम दिसत नाही, असे दुकानदारांनी सांगितले.
मास्क लावले असेल तरच मिळेल दारू! मास्क लावले असेल तरच मिळेल दारू!
फरिदाबादमध्ये ग्राहकांचे हात सॅनिटाइझ करुनच त्यांना दारू दिली जात आहे. दुकानदारांनी दुकानांसमोर बॅरिकेट्स लावले असून मास्क न लावलेल्या व्यक्तीला दारू विकली जात नाही. ग्रीन झोन असलेल्या रेवाडीमध्ये इतर दुकानांसह दारूची दुकानेही सुरू करण्यात आली आहेत.
रोहतकमधील दुकानांवर नाही गर्दी - रोहतकमधील दुकानांवर नाही गर्दी -
आज सकाळपासून रोहतकमधील दारूची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र, येथील नागरिकांनी घरातच थांबने पसंत केले आहे. मद्यविक्री दुकानांवर लोकांची तुरळक ये-जा दिसून आली. देशी दारू पाच तर विदेशी दारूच्या किमतीत २० ते ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.