वर्धा -वर्ध्यातील दत्तपूरच्या नेत्रदीपक फाउंडेशन येथे हरियाणा गुडगाव येथील दाम्पत्य आले होते. त्यांना अगोदरच क्वारन्टाईनमध्ये ठेवण्यात आले होते. यातील 65 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला त्रास झाल्याने त्यांना सेवाग्राम येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली आहे. आता ही संख्या 14 वर पोहोचली आहे.
हरियाणा गुडगाव येथून 5 जूनला हे दाम्पत्य वर्ध्यात आले. त्यांना दत्तपूरच्या नेत्रदीपक फाऊंडेशनमध्ये ठेवण्यात आले. त्यांना काल रात्री श्वास घेण्यासाठी त्रास झाला. यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणून नंतर सेवाग्राम कोविड केअर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्या 65 वर्षीय व्यक्तीच्या पत्नीचाही स्वॅब घेऊन चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
वर्ध्यात पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह, गुडगावहून आले होते दाम्पत्य - Wardha Corona Live Update
हरियाणा गुडगाव येथून 5 जूनला हे दाम्पत्य वर्ध्यात आले. त्यांना दत्तपूरच्या नेत्रदीपक फाऊंडेशनमध्ये ठेवण्यात आले. यातील 65 वर्षीय वयोवृध्द व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या पत्नीचाही स्वॅब घेतला असून अहवाल येणे बाकी आहे.
वर्धा कोरोना रुग्ण
जिल्ह्याची आताची स्थिती
वर्धा - 4
आर्वी - 5
आष्टी -1
हिंगणघाट -2
सेलू- 1
आज नव्याने सापडलेले रुग्ण - 1
एकूण -14 पैकी 1 मृत्यू