अकोला : राज्यात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात आज(गुरुवार) सायंकाळी प्राप्त कोरोना तपासणी अहवालनुसार सहाजण आणि सकाळी 25 असे मिळून एकूण 31 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर 25 जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.
अकोल्यात आज 31 कोरोनाबाधित तर, 25 रुग्णांची कोरोनावर मात - akola corona new cases today
अकोल्यात आत सकाळी 25 तर संध्याकाळी 6 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी प्राप्त सहा अहवालात दोन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. तर, दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 8 जणांना आणि कोविड केअर सेंटर येथून 17, अशा एकूण 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज सायंकाळी प्राप्त अहवालात सहा जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यात दोन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. यातील दोनजण बोरगाव मंजू येथील, दोनजण आदर्श कॉलनी तर तेल्हारा व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान, दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 8 जणांना तर कोविड केअर सेंटर येथून 17, अशा एकूण 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्राप्त अहवालानुसार
प्राप्त अहवाल - 418
पॉझिटिव्ह - 31
निगेटिव्ह - 387
*आता सद्यस्थिती*
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 1807+21= 1828
मृत -91 (90+1)
डिस्चार्ज- 1369
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)- 368