महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची 'हाफ सेंच्युरी'; मंगळवारी 4 रुग्णांची भर

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्हयात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये राजुरा येथील साई नगर भागातील २७ वर्षीय युवक कोरोना बाधित आढळला आहे. हा युवक अहमदाबादवरून परत आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता.

chandrapur corona news
chandrapur corona news

By

Published : Jun 16, 2020, 9:40 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात मंगळवारी (16 जून) कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी 4 रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची हाफ सेंच्युरी पुर्ण झाली आहे. राजुरा आणि बल्लारपूर या तालुक्याच्या ठिकाणी नवे 3 जण कोरोनाबाधित आढळले आहे. मंगळवारी सकाळी ब्रह्मपुरी तालुक्यामधील मालडोंगरी गावातील एका युवकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तर सायंकाळी राजुरा शहरातील एक आणि बल्लारपूर शहरातील दोन अशा एकूण चार कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्हयात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये राजुरा येथील साई नगर भागातील २७ वर्षीय युवक कोरोना बाधित आढळला आहे. हा युवक अहमदाबादवरून परत आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. तर बल्लारपूर शहरातील टिळकनगर भागातील वडील आणि मुलगी सुरत शहरातून आल्यानंतर गृह अलगीकरणात होते. सोमवारी या तिघांचे घशातील स्त्राव घेण्यात आले होते. त्यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील मुंबईवरून आलेल्या १९ वर्षीय युवकाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर त्याला ब्रह्मपुरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. १५ जूनला त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. हा युवक कोरोना बाधीत असल्याचे सकाळी निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आजच्या एकूण ४ बाधीतांमुळे चंद्रपूर जिल्हयातील बाधित रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. सर्व चारही बाधितांची प्रकृती स्थिर आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे (1), १३ मे (1) २० मे (10) २३ मे (7) आणि २४ मे (2) २५ मे (1) ३१ मे (1) २जून (1) ४ जून (2) ५ जून (1) ६जून (1) ७ जून (11) ९ जून (3) १०जून (1) १३ जून (1) १४ जून (3) १५ जून (1) १६ जून (4) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ५२ झाले आहेत. आतापर्यंत २५ कोरोनाबाधित रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ५२ पैकी अ‌ॅक्टिव्ह बाधितांची संख्या आता २७ झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details